चिपळुणात देशी दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल
चिपळूण : तालुक्यातील नांदगाव- गुरववाडी येथे देशी दारू विक्री करणाऱ्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. त्याच्याकडून ६१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अनिल महादेव रसाळ (५५, नांदगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मनीष रघुनाथ कांबळे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल रसाळ नांदगाव येथील एका घराच्या बाजूला देशी दारूची बेकायदा विक्री करताना पोलिसांना सापडला. यावेळी त्याच्याकडून ६१० रुपये किंमतीच्या ८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.