केंद्रस्तरिय तपासणी पथकाने केली सत्कोंडी ग्रामपंचायतीची पाहणी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” उपक्रम
रत्नागिरी:
२ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेल्या भारत स्वच्छ मिशनचा टप्पा क्रमांक २.१ हा २ ऑक्टोबर २०२० ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२५ ची तपासणी केंद्रस्तरीय पथकाकडून नुकतीच करण्यात आली. अखंड भारतातील काही निवडक ग्रामपंचायतींची तपासणी या आठवडाभरात पार पडली, यामध्ये रत्नागिरी तालुक्यातून निवडलेल्या पाच ग्रामपंचायतीं पैकी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीची तपासणी रविवार १३ जुलै २०२५ रोजी केंद्रस्तरीय पथकाने पाहणी करून संपन्न झाली.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५ च्या निकषांनुसार शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, वैयक्तिक व दिव्यांग कुटुंबाना भेट देऊन स्वछतागृह व परिसर पाहणी केली. याचसोबत गावातील शोषखड्डे, कचरा विलगीकरण शेड, हँडवॉश स्टेशन, परसबाग निर्मिती, रस्ते सफाई, गांडूळखत प्रकल्प, गटारे यांची पाहणी या केंद्रस्तरीय पथकाने केली. आणि शिक्षक, अंगणवाडी, आरोग्यविभाग, ग्रामपंचायत, बचतगत कर्मचारी तसेच नागरिकांशी संवाद साधला.
या केंद्रस्तरीय समितीमध्ये संपूर्ण भारतात तपासणीचा मक्ता मिळालेल्या संस्थेचे अमोल राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. रत्नागिरीचे पाणी गुणवत्ता तालुका समन्वयक अधिकारी सविनय जाधव, कृषिविस्तार अधिकारी अक्षय शिंदे आदी अधिकारी यांनी काम पाहिले.
तर या सर्व तपासणीसाठी लगतच्या नांदीवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जाधव व सैतवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिर्के यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी उपस्थितांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे सरपंच सतिश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण मोर्ये, ग्रामसेवक, श्रीकांत कुळ्ये, ग्रामपंचायत सदस्य अजय काताळे, प्रणाली मालप, समिक्षा घाटे, ममता बंडबे, निकिता शिगवण, ग्रामपंचायत कर्मचारी किरण बलेकर, विश्वनाथ बैकर, रोहीदास मालप, राजश्री गोताड, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पालये, सुशिल वासावे, महेश राहणे, प्रकाश मालप, अंगणवाडीसेविका चित्रा बैकर, कमल मालप, रूपाली घोसाळे, आशा वर्कर्स सुजाता खापले, नेहा पवार, सि.आर.पि. संगिता मोर्ये, आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी, आरोग्य सेवक अमोल भोके, आरोग्य सेविका पूनम लाड, लवंदे, सत्कोंडीचे पोलिस पाटील श्रीकांत खापले, मदतनीस रुपाली बैकर, सारिका खापले, सुनिता घवाळी आदी मान्यवर उपस्थित होते.