संगमेश्वर तालुक्यात ६४ ठिकाणी महिलाराज
देवरूख:-
संगमेश्वर तालुक्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. देवरूख येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात ही आरक्षण सोडत तहसीलदार अमृता साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या मनाप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे त्यांची अपेक्षा पूर्ण झाली तर काही इच्छुकांच्या मनाप्रमाणे आरक्षण पडले नसल्याने त्यांची घोर निराशा झाली.
तालुक्यातील १२७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरीता अनुसुचित जाती- ६, महिला- ३, अनुसुचित जमाती- ०, महिला- ०, नागरिकांचा मागास प्रवर्ग- ३४, महिला- १७, खुला प्रवर्ग- ८७, महिला- ४४ असे प्रवर्गानुसार आरक्षण असणार आहे. सन 2025 ते 2030 सरपंच आरक्षण निश्चितीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र. 19756/2021 प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 06 मे 2025 रोजी पारित आदेशास अनुसरुन शासनाने दिनांक 5 मार्च 2025 रोजी काढलेली सरपंच पदांचे जिल्हानिहाय वाटप अधिसुचना अधिक्रमित करुन दिनांक 13 जुन 2025 रोजीच्या अधिसुचनेनुसार, मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील क्र./जिकार/कार्या-3/ग्रापंनि सरपंच आरक्षण/2025 दिनांक -07/07/2025 अन्वये संगमेश्वर तालुक्यातील 127 ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीत होणा-या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियम, 1964 मधील नियम 3 (अ) (ब) व 4 प्रमाणे तालुक्यातील सरंपच पदे आरक्षित करणेबाबत ग्रामपंचायत सरपंच पदे आरक्षण सोडत सोमवारी सकाळी ११ वा. काढण्यात आली.
यामध्ये अनुसूचित जाती आरक्षित ग्रामपंचायती कोंडअसुर्डे, काटवली, पाटगाव, अनुसूचित जाती स्त्रिया उजगाव, आंबेड खुर्द, शिवधामापूर, नागरिकांचा मागास प्रवर्ग नावडी, लोवले, देवळे, करजूवे, साखरपा, आंबवली, वाशी (ता. संगमेश्वर), कोळंबे, घोडवली, कोंडकदमराव, ते-ये, हरपूडे, बामणोली, कुरधुंडा, घाटीवळे, वांझोळे, चोरवणे, मागास प्रवर्ग स्त्रिया मेढे (ता. फुणगुस), ओझरे खुर्द, असुर्डे, शेंबवणे, कळंबुशी, किरडूवे, आंबव, ताम्हाणे, मांजरे, साडवली, मासरंग, कळंबस्ते, माभळे, फुणगुस, माखजन, बोरसूत, शिवणे, सर्वसाधारण प्रवर्ग परचुरी, डिंगणी, वाशी (ता. देवरूख), निवे बुद्रुक, कोसुंब, करंबेळे (ता. संगमेश्वर), वायंगणे, भडकंबा, पुर्ये (ता. देवळे), किरबेट, बोंडये, मारळ,
खडीकोळवण, मोर्डे, कडवई, चिखली, कुचांबे, गोळवली, अंत्रवली, कसबा संगमेश्वर, कुंभारखाणी खुर्द, उमरे, गुरववाडी, पोचरी, कोंडगाव, सरंद, पेढांबे, कुळये, मुचरी, कांटे, कर्ली, धामापूर (ता. देवरूख), तुळसणी, सायले, चाफवली, आंगवली, कासारकोळवण, राजवाडी, बुरंबाड, कुंभारखाणी बु., फणसवणे, मेघी, सांगवे, सर्वसाधारण स्त्रिया मुरादपूर, नांदळज, पांगरी, पूर, फणसवळे, विघ्रवली, सोनवडे, तिवरे (ता. देवळे), मुर्शी, दाभोळे, कनकाडी, देवडे, निवेखुर्द, बेलारी बु., रांगव, धामणी, कारभाटले, नायरी, तिवरे घेरा (प्रचितगड), कोंडिवरे, आरवली, मुरडव, नारडूवे, धामापूर (ता. संगमेश्वर), तांबेडी, तुरळ, ओझरखोल, वांद्री, मावळंगे, कासे, राजिवली, ओझरे बुद्रुक, डावखोल, हातीव, कोंडये, पाचांबे, पिरंदवणे, आंबेड बु., शृंगारपूर, निवळी, शिरंबे, कुंडी, फणसट, पुर्ये या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.