कोकणात चित्रशाळात गणेश मूर्तीच्या कामास वेग
रत्नागिरी :
श्रावण मास अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सार्या कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यामुळे चित्रशाळांतील मूर्तीकार गणेश मूर्तीकामात मग्न झाले आहेत. रत्नागिरी वरचा फगरवठार येथील मूर्तीकार श्री.वामन सुवरे यांच्या चित्रशाळेत शंभर गणेशमूर्ती आतापर्यंत साकार करण्यात आल्या आहेत.
या वर्षी कृष्ण अवतारातील कृष्ण बलरामाचे बंधू प्रेम, यशोदा कृष्ण दहीहंडी फोडताना , लालबागचा राजा सिंहासनावर विराजमान झालेली गणेश मूर्ती,अशा विविध प्रकारच्या गणेश मूर्ती साकारल्या जात आहेत. परंतू सिंगल गणेश मूर्तींना सर्वात जास्त मागणी गणेश भक्तगण करीत आहेत.
गेली तीस वर्षे हे गणेश मूर्तीकाम मी उत्कृष्टरीत्या करीत आहे.त्यामुळेच पावस ,रत्नागिरी पंचक्रोशीतील गणेश भक्तगण आमच्या रत्नागिरीतील मूर्तीकार श्री.वामन सुवरे यांच्या चित्रशाळेला भेट देऊन गणेश मूर्ती साकारण्यास सांगत आहेत. अशी माहिती मूर्तीकार श्री.वामन विठ्ठल सुवरे यांनी पत्रकारांशी मुलाखत घेत असताना सांगितले आहे.
त्याच प्रमाणे गणपती मूर्तीसाठी लागणारी माती , कलर , ब्रश, गणेश मूर्तीसाठी लागणारे पितांबर, हिरे ,फेटे यांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी देखील सर्वांनाच परवडेल अशा किंमतीत गणेश मूर्ती देण्यासाठीच आमचे कायम प्रयत्न भक्तीभावापोटी असतात.असे मूर्तीकार श्री.वामन विठ्ठल सुवरे यांनी सांगितले .या कलेतून प्रेम आपुलकी वृद्धिंगत होत आहे.
त्यातच ऐनवेळेस लाईट जाते त्यामुळेच गणेश मूर्तीकामात अडथळा निर्माण होतो.सध्या गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तीकार गणेश मूर्तीकामात मग्न झाले आहेत.
फोटो = गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तीकार श्री.वामन सुवरे मूर्तीकामात मग्न झाले आहेत
छाया = दिनेश पेटकर गावखडी