सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क ; संशयिताविरुद्ध गुन्हा
पावस: पावस ते गोळप जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी वाहतूकीस अडथळा होईल असे पार्क करणाऱ्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश सुरेंद्र लोधी (वय २१, रा. एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयितांचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १२) दुपारी चारच्या सुमारास पावस ते गोळप जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मुकेश लोधी यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ एसी ४६४१ ) ही वाहतूकी अडथळा व धोका होईल अशा स्थितीत लावून ठेवली. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार संजय शिवगण यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.