वाहतूकीस अडथळा करणाऱ्या तीन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील कुवारबाव, गवळीवाडा ते धनजीनाका, मच्छी मार्केट ते चर्चरोड येथे वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र महादेव जाधव (वय ४६, रा. सैतवडे, रत्नागिरी), भाग्यवान संतोष कवितके (वय ४१, रा. माळनाका, रत्नागिरी), अनिल तानू कावणकर (वय ४६, रा. अडूर, ता. गुहागर, रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नावे आहे. या घटना गुरुवारी (ता. १०) दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या सुमारास कुवारबाव, धनजीनाका, चर्चरोड येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रवींद्र जाधव यांनी टेम्पो ट्रव्हल्स (क्र. एमएच-०८ इडब्ल्यू ५४९५) दुपारी दीड वाजता कुवारबाव येथील इंडियन ऑइल पेट्रोलपंप समोर अडथळा होईल अशी लावून ठेवली. भाग्यवान कवितके यांनी पिकअप गाडी (एम.एच -०८ डब्ल्यू ५१४९) ही धनजीनाका रस्त्यावर तर अनिल कावणकर यांनी टेम्पो (क्र. एमएच-०८ डब्ल्यू ६५९९) मच्छीमार्केट ते चर्च रोड जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क केले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे, वैभव नार्वेकर, प्रमोद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.