तरवळ येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू.
रत्नागिरी ः घराचे सुतारकाम करत असताना पडून वृद्ध गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होता. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दत्तात्रय शंकर पांचाळ (वय ६०, रा. मायंगडेवाडी-तरवळ, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ८) रात्री पावणेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय पांचाळ हे कुंबारवाडी येथील लक्ष्मण नारायण साळवी यांच्या घराचे सुतारकाम करत असताना पडले त्यांच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी साळवी स्टॉप येथील निर्मल रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.