चिपळुणात बेकायदा दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा
चिपळूण
पिंपळी-खुर्द, निवळी-परिटवाटी येथे बुधवारी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
९ जुलै रोजी दुपारी १.२५ वाजता पिंपळी खुर्द येथील कॅनॉल ब्रिजच्या बाजूला एका आंब्याच्या झाडाच्या आडोशाला सुनील महादेव मोडक (४०, कान्हे- मोडकवाडी) हा देशी दारू विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येथे छापा मारला. यावेळी त्याच्याकडे ८४० रुपये किमतीच्या १२ बाटल्या मिळून आल्या. याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण सदाशिव जाधव यांनी दिली आहे.
तसेच मौजे निवळी-परिटवाटी येथे ९ रोजी ६.४५ वाजता वसंत पांडूरंग कोदारे (६१, निवळी-कोदारेवाडी) हा गावठी दारू विकताना मिळून आला. त्यांच्याकडून ८६० रुपये किमतीची ८ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याची फिर्याद सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सागर निवृती साठे यांनी दिली आहे.