
ऑफ्रोह रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर रोडे
रत्नागिरी
ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) रत्नागिरीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी किशोर रोडे तर सचिव म्हणून हेमराज सोनकुसरे व सहसचिवपदी राजेश कुंभारे यांची निवड करण्यात आली.
ऑफ्रोह व महिला आघाडीची मासिक सभा नुकतीच घेण्यात आली. ऑफ्रोह रत्नागिरीची नूतन कार्यकारिणीनुसार जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, कार्याध्यक्ष बापुराव रोडे, उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव हेमराज सोनकुसरे, सहसचिव राजेश कुंभारे, कोषाध्यक्ष सतीश घावट, महिला संघटक उषाताई पारशे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य-सिंधुताई सनगळे, देवकीनंदन सपकाळे, पंडित सोनवणे, पंढरीनाथ पपुलवार, आकाश दांडगे, गजानन उमरेडकर, श्रीकृष्ण भांडे, पद्माकर पवार, प्रमोद सोनकुसरे, लता वडाळ यांचा समावेश आहे.
सर्व नूतन कार्यकारिणीचे निवडीवेळी ऑफ्रोह चे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, महासचिव डॉ. दीपक केदार, महिला आघाडी राज्याध्यक्ष अनघा वैद्य, उपाध्यक्ष प्रियाताई खापरे, भारतीताई धुमाळ प्रसिद्धीप्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशाताई पारशे, उपाध्यक्ष सुनंदा फुकट, सचिव स्वाती रोडे यांची उपस्थिती होती.