लोखंडी कटर लागून तरुण गंभीर जखमी
रत्नागिरी ः फर्निचरचे काम करत असताना लोखंडी कटर लागून तरुण जखमी झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. नंदकुमार रवींद्र पांचाळ (वय ३०, रा. लांजा) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लांजा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदकुमार पांचाळ हा चौधरी फर्निचर-लांजा येथे फर्निचरचे काम करत असताना अचानक लोखंडी कटर त्याच्या हाताच्या पंजाला लागला. तात्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पुढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या बाबत जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.