
न्यायालयात मद्यपान करुन गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी
रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक वसंत मालप (वय ५३, रा. पानगलेवाडी, पावस, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अशोक मालप हा मद्यपान करुन न्यायालयाच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरडा करुन शांततेचा भंग करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हवालदार अभिजीत पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.