
दापोलीत झारखंडमधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात जितेंद्र भुईया बिगन भुईया (वय 37, सध्या रा. हर्णे, मूळ रा. पिंपरा, पोस्ट मयुरहडन, ता. मयुरहडन, जि. चत्र, झारखंड) यांचा उपचारादरम्यान 30 जून रोजी रात्री 08.30 वाजता मृत्यू झाला.
खबर देणारे राजेश यादव यांनी सांगितले की, त्यांचा मित्र जितेंद्र भुईया याला 28 जून रोजी ताप आणि थंडी आल्यामुळे हर्णे येथील डॉ. अंतुले यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी जास्त ताप असल्यामुळे इंजेक्शन व औषधे दिली आणि फरक न पडल्यास सरकारी दवाखान्यात उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जितेंद्रला त्याच्या रूमवर नेले असता, त्याच्या तब्येतीत फरक जाणवत होता.
30 जून 2025 रोजी सायंकाळी 07.00 वाजता जितेंद्र झोपेतून उठला आणि त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर राजेश यादव यांनी शेजारी राहणाऱ्या प्रभु मेहता याला रिक्षाने दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून रात्री 08.30 वाजता जितेंद्रला मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.