मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ः तालुक्यातील कोतवडे ते खरवते सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ताराम देवजी परकर (वय ६७, रा. कोतवडे बाजारपेठ, रत्नागिरी) असे मद्यपान करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २९) जून रात्री सव्वा आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध दत्ताराम परकर यांच्या मद्यपानाचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करत होते. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय शिवगण यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.