
शामरावपेजे स्मृति न्यास ट्रस्ट आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन म्हणून १९ गावातील शेतकऱ्यांस रोपवाटिकांचे वितरण करण्यात आले
रत्नागिरी : शामरावपेजे स्मृति न्यास ट्रस्ट आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम वेळोवेळी राबवले जातात.त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक २९/०६/२०२५ रोजी खालगाव येथे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून हॉटेल कोकण गारवा येथील हॉलमध्ये खालगाव-जाकादेवी पंचक्रोशीतील तरवळ,पोचरी,कोंड्ये,चवे,परचुरी, उपळे,मेढे,फुणगुस,उक्षी,देण,राई, आगरनरळ,चाफे,विल्ये,मांजरे,ओरी, खालगाव,देवूड,बोंड्ये(नारशिंगे) अशा १९ गावातील सुमारे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांस रक्तचंदनाची झाडे वितरीत करण्यात आली व दोन्ही संस्थांचे वतीने ‘झाडे लावा,झाडे जगवा’ हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शामराव पेजे स्मृति न्यासचे अध्यक्ष श्री.सुजित झिमण, श्री.अनिल नवगणे (कुणबी समाजोन्नती संघ मुंबई), ट्रस्टी शामराव पेजे ट्रस्ट श्री. हरिश्चंद्र गीते, खजिनदार श्री.गजानन चाळके, खजिनदार श्री. विवेक सावंत, कृषी तज्ञ श्री. डॉ. नागवेकर त्याचबरोबर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व शामराव पेजे न्यासाचे सदस्य ॲड.श्री.महेंद्र मांडवकर , श्री. सचिन गोताड,श्री.अनिकेत पाटील, श्री. साहिल रेवाळे,श्री. राज फुटक त्याचबरोबर खालगाव पंचक्रोशीतील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी मोठयाप्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान केले व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यास सांगितले. तसेच “रक्तचंदन” झाडाचे महत्व समजावून सांगताना डॉ.श्री.नागवेकर(कृषी तज्ञ) यांनी विविध झाडांबद्दल थोडक्यात तज्ञ मार्गदर्शन केले.
शेवटी सर्व शेतकरयांना रक्त चंदनाच्या झाडांचे वाटप करण्यात आले व उपस्थित सर्व मान्यवर व शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.