
सावर्डे येथे रस्त्यात निष्काळजीपणे ट्रेलर उभा केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
सावर्डे : मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे येथे २७ जून रोजी सकाळी १०.४५ वाजता बाजारपेठेत पृथ्वी नाथ पिता बाबु नाथ (रा. राजस्थान) याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर (क्र. RJ 19GG3419) अशा पद्धतीने उभा केला होता की, इतर वाहने आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. याच निष्काळजीपणामुळे होंडा लिवो दुचाकी (क्र. MH08AJ 5829) वरील स्वार (मयत) ट्रेलरला धडकून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विनायक तुकाराम साळवी यांच्या फिर्यादीनुसार नाथ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सावर्डे पोलिस करत आहेत.