
ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप वितरित
रत्नागिरी, : डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण करण्यात आले.*
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
या लॅपटॉप आणि प्रिंटरमुळे तलाठी, मंडळ अधिकारी ई-फेरफार प्रणाली वापर कर्ते यांना अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी सोपे होणार आहे.