
संगमेश्वर सुतारवाडी येथील १९ वर्षीय मुलगी बेपत्ता
संगमेश्वर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिली फिर्याद
संगमेश्वर : तालुक्यातील सुतारवाडी वाडा येथील दिव्या विजय बोंडकर (वय १९ वर्ष) ही दिनांक २४ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता घराबाहेर निघून गेली. ती घरात नसल्याचे ध्यानात आल्यावर आजुबाजुला शेजारच्या घरांमध्ये विचारणा केली. कुटुंबियांनी नातेवाईक, मित्र मैत्रिणींकडे चौकशी करून माहिती घेतली.तिच्याकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन बंद असल्याची माहिती मिळाली. खुप उशीरा शोध, चौकशी करून हताश झालेला कुटुंबियांनी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे धाव घेतली.
पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, विषय बाळकृष्ण बोंडकर यांनी त्यांची मुलगी दिव्या बेपत्ता झाल्याची तक्रार झालीय. उंची ५ फूट,रंग गोरा, लांब काळे केस, मध्यम बांधा, सरळ नाक, असे वर्णन केले. घरातून जाताना तीने गुलाबी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीज,पांढऱ्या रंगाची ओढणी परीधान केली होती. तरी सदर वर्णनानुसार बेपत्ता मुलगी कुमारी दिव्या विजय बोंडकर कुठेही आढळली अथवा तिच्या बाबतीत काही माहिती असल्यास, मिळाल्यास संबंधित व्यक्तींनी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे संपर्क करावा असे आवाहन संगमेश्वर पोलीसांनी केले आहे.