
सदनिका फोडून चोरला टिव्ही
चिपळूण: सावर्डे-वहाळफाटा येथील बंद सदनिका फोडून चोरट्यांनी स्मार्ट टिव्ही चोरल्याची घटना घडली असून या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद गंगाराम कदम (५६, मूळ गाव-वडेरू मधलीवाडी, सध्या वडाळा मुंबई) यांनी याची फिर्याद दिली. त्यांची वहाळफाटा येथील क्लासिक रेसिडेन्सीत सदनिका आहे. ती बंद ठेऊन ते मुंबईत राहतात. असे असताना २३ ते २४ जूनदरम्यान चोरट्यांनी ही सदनिका फोडून ६ हजार रुपये किंमतीचा ५१ इंची १५ वर्षापूर्वी खरेदी केलेला स्मार्ट टिव्ही चोरून नेला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.