
वेरळ अपघातप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा
खेड : तालुक्यातील वेरळनजीक रिक्षाला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक गणपत काशिराम जाधव (कुळवंडी-जांभूळवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते आपल्या ताब्यातील रिक्षा (एम.एच. ०८ ए.क्यू. ७०८१) घेवून घरी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने (एम.एच. ०८ ए.यू. ८६३०) दुचाकीने धडक दिली. दुचाकीवरून तिघेजण प्रवास करत होते. रिक्षाचालकाच्या दुखापतीसह नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराव्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.