
वाहनांची परस्पर विक्री करून 70 लाखांची फसवणूक; रत्नागिरीतील दोघांना अटक
रत्नागिरी: बनावट कागदपत्रांच्या आधारे 4 चारचाकी वाहनांची परस्पर विक्री करून 70 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय 33, रा. खेर्डी, ता. चिपळूण, रत्नागिरी), हसन मगदूम जहॉगिरदार (31, कारवांचीवाडी, ता. रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सागर हरी देसाई (रा. टेंबलाईवाडी) यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. महंमद हकीम मोहम्मद हाजी (मक्सुद कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), संजय दत्तात्रय हावलदार (त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा, ता. करवीर) आणि मनीषा भैयाजी फुके (येणेकोणी, ता. नरखेड, नागपूर) या फरारी संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. एप्रिल ते मे 2024 या काळात फसवणुकीचा प्रकार घडला.
सागर देसाई यांचा न्यू शाहूपुरी येथे चारचाकी वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील वाहनांची विक्री करून देतो, असे सांगून संशयितांनी वाहनांची परस्पर विक्री केली. बनावट कागदपत्रे तयार केल्याचाही आरोप आहे.