
रत्नागिरी मत्स्यालयात प्रवेशासाठी आता ‘डिजिटल पेमेंट’
रत्नागिरी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, अंतर्गत एक प्रेक्षणीय असे ‘मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय’ विद्यार्थी आणि पर्यटकांकरिता झाडगाव येथे सुरू आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्रवेशासाठी डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या मत्स्यालयमध्ये गोड्या पाण्यातील माशांचे अक्वॉरियम, निमखारे आणि खाऱ्या पाण्यांतील मत्स्यालय, तसेच प्लांटेड अक्वॉरियम वांची सुंदर मांडणी व सजावट करण्यात आली आहे. या मत्स्यालय मध्ये गोड्या आणि सागरी पाण्यातील जवळपास ९० माशांच्या प्रजाती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. मत्स्य संग्रहालयामध्ये विविध २५४ जलचर प्रजाती रसायनामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत. तर विविध शंख-शिंपल्यांच्या २५० प्रजाती प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत. मत्स्य संग्रहालयातील डॉल्फिन मासा, ४० फुटी लांबीचा देवमासा सांगाडा व ५० वर्षाहून जास्त काल जतन केलेले कासव, हे पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतात.
या मत्स्यालय व संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांनी डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा निर्माण करण्याची विनंती केली होती. नुकतीच येथे पर्यटक आणि विविध कार्यालयीन पेमेंट करिता डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या हस्ते पूजा करून पी.ओ.एस. मशिनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे प्रथम तिकीट डॉ. स्वप्नजा मोहिते यांना देऊन सुरुवात करण्यात आली. पर्यटकांनी यु.पी.आय. पेमेंट, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड द्वारे पेमेंट करून या सोयीचा सर्व पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आशिष मोहिते, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी केले. डिजिटल पेमेंट करिता आवश्यक पी.ओ.एस. मशिन, भारतीय स्टेट बैंक, रत्नागिरी यांनी निःशुल्क पुरविल्या बद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
‘ऑनलाईन पेमेंट प्रणाली सुरू करण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. आसिफ पागारकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरिष घमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम व प्रा. कल्पेश शिंदे (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ) तसेच रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक), महेश किल्लेकर (यंत्र चालक बोट) व दिनेश कुबल (बोटमन), श्रीम. जाई साळवी (वरिष्ठ लिपिक), सचिन पावसकर (लिपिक), मनिश शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), सुहास कांबळे व राजेंद्र कडव (शिपाई), प्रवीण गायकवाड (क्षेत्र संग्राहक), सचिन चव्हाण (मजूर), स्वप्नील आलीम, तेजस जोशी, योगेश पिलणकर, उल्हास पेडणेकर, दर्शन शिंदे, व प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.