
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ‘ आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा
रत्नागिरी : आज आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अक्षय माळी सर, सहाय्यक प्राध्यापक ( योग विभाग ) कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक चे रत्नागिरी उपकेंद्र यांचे वृक्षरोप देऊन स्वागत केले. अक्षय माळी सर यांनी प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला वॉर्म अप घेऊन ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन,अर्ध पद्मासन, पद्मासन,वज्रासन,अर्ध हलासन,हलासन,नौकासन, उष्ट्रासन,बद्ध पद्मासन,भुजंगासन, शवासन, अश्या प्रकारे आसने प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्या कडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी अक्षय माळी सर यांनी मनुष्य जीवनातील योग व व्यायाम यांचे महत्व सांगितले.
सदर कार्यक्रमाला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी मधील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच MBBS चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.