
लोटेमाळ अपघातप्रकरणी पिकअप व्हॅन चालकावर गुन्हा
खेड
लोटेमाळनजीक महामार्गावर झालेल्या अपघातात नितीन शरद म्हादलेकर (२७) हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी पिकअप व्हॅन चालक भाऊ बबन मरगळे (३७) याच्यावर बुधवारी येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस फौजदार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
संशयित त्याच्या ताब्यातील पिकअप व्हॅन (एमएच १२ एसएफ ३६६३) घेऊन चिपळूणच्या दिशेने जात होता. इंडिकेटर न देता अचानकपणे चुकीच्या बाजूला जात खेडच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली व पलायन केले होते.