
सक्तीची ” हिंदी नकोच” राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीतील मनसे कडून अंमलबजावणी
रत्नागिरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आणि पत्र घेऊन रत्नागिरीतील मनसे शिष्टमंडळाने शहरातील महत्वाच्या शाळाना भेट देऊन तेथील मुख्याध्यापकांची भेट घेऊन शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी शाळेमध्ये हिंदी अनिवार्य करण्यास विरोध करावा असे निवेदन दिले.
इयत्ता पहिली पासून तिसरी पर्यंत सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी करण्यासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण, शहर संघटक अमोल श्रीनाथ या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यस्थापनांना निवेदन देण्यात आले . हिंदी विषय सक्तीला मनसे बरोबरच मराठी माणूस म्हणून शिक्षक तसेच पालक वर्गाने देखील याला विरोध करावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी विभाग अध्यक्ष राहुल खेडेकर, सोम पिलनकर, रोहन शेलार , अँड. माधवी पालकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाचे पत्र रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूल, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूल , विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आदी शहरातील प्रमुख शाळांना देण्यात आले.