
कापडगाव येथे विद्युत खांबावरुन पडून वायरमन जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील कापडगाव येथे विद्युत खांबावर वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना उभा लोखंडी खांब अचानक खाली पडल्याने त्यावर काम करत असलेला वायरमन पडून जखमी झाला आहे. सुचित सुरेश घाणेकर (रा. सध्या नेमणूक कापडगाव मूळ रा. खानू
रत्नागिरी) असे जखमी वायरमनचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पोलिसाकंडून मिळालेल्या माहितीनुसार सुचित घाणेकर हे कापडगाव-सुतारवाडी येथे विद्युत खांबावर चढून वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना चढलेला उभा असलेला लोखंडी खांब अचानक खाली कोसळल्याने त्यावर काम करीत असलेला वायरमन सुचित घाणेकर जोराने जमिनीवर आपटून जखमी झाले. तातडीने त्याला उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात आणून प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे.