
तरुणीवर अत्याचारप्रकरणी संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी
खेडः तरुणीवर अत्याचार करत तिचे अश्लील फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या अजय नामदेव पवार (२५, जयसिंगपूर कोल्हापूर, सध्या रा. भरणे) याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पीडित युवती व तरुणाचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करत अश्लील फोटोही होणाऱ्या पतीस व्हायरल केल्याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आले होते. दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.