
विनापरवाना दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
दापोली : तालुक्यातील गावतळे येथे विनापरवाना देशी-विदेशी दारूसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत सुरेश पवार (३८, रा. गावतळे, दत्तवाडी, ता. दापोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावतळे येथे ६ जून रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास श्रीकांत पवार यांच्या ताब्यात सुमारे १,२०० रुपये किंमतीची हाय वर्ल्ड फाईन विस्की असे लेबल असलेल्या १८० मि.लि. मापाच्या १० विदेशी दारूच्या बाटल्या, सुमारे ८४० रुपये किंमतीचे देशी दारू संत्रा जीएम असे लिहिलेल्या १८० मि.ली. मापाच्या १२ दारूच्या बाटल्या असा सुमारे २,०४० रुपयांचा मुद्देमाल दापोली पोलिसांनी ताब्यात घेतला. श्रीकांत पवार याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.