
रिक्षा-दुचाकी अपघातात 6 जण जखमी
रत्नागिरी:
शहरातील आरोग्य मंदिर येथे रिक्षा व दुचाकीच्या धडकेत रिक्षातील चार व दुचाकीवरील दोन असे 6 जण जखमी झाल़े आहेत. अपघाताची ही घटना रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी.
अपघातातील जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आह़े. रिक्षातील जखमींमध्ये रिक्षाचालक अजित अरविंद वाडकर (53, ऱा कारवांचीवाडी रत्नागिरी), विनोद शंकर धनावडे, तेजस विनोद धनावडे (12, ऱा दोन्ही वाटद खंडाळा रत्नागिरी) कार्तिक किरण घेवडे (18, ऱा फुणगुस रत्नागिरी) तर दुचाकीवरील जखमींमध्ये अमजल खालिद मजगांवकर (19) व सलमान सुलेमान दर्वे (18, ऱा दोन्ही मिरकरवाडा रत्नागिरी) आदींचा समावेश आह़े.
रविवारी दुपारी झालेल्या या अपघातामध्ये अपघातग्रस्त रिक्षा ही कुवारबाव येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होती. अपघातानंतर ही रिक्षा पलटी होऊन दुचाकीवर कोसळली. यात दुचाकी आणि रिक्षा या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.