
नीलेश सांबरे शिवसेनेत दाखल
रत्नागिरी : जिजाऊ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाण्यात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं निशाण हाती घेतले आणि शिंदे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली आहे. शिवसेना पक्षाचा विस्तार आणि लोकसंपर्क अधिक बळकट होतोय, हे परिवर्तनाचं प्रतीक आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले.