
देवरुख बाजारपेठ येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः देवरुख (ता. संगमेश्वर) येथील एका बेकरी इमारतीच्या बाजूच्या गल्लीत विनापरवाना मटका जुगारावर देवरुख पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश नाना कदम (वय ४५, रा. देवरुख आंबेडकरनगर, ता. संगमेश्वर ) असे संशयिताचे नाव आहे ही घटना मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास देवरुख बाजारपेठ येथील एका बेकरीच्या दुकानाच्या बाजूच्या गल्लीत पाठीमागे एका बिल्डींगच्या बाजूला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका-जुगार चालवत असताना सापडला. त्याच्याकडून पोलिसांनी साहित्यासह ८३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस अमंलदार करत आहेत.