
जयगडजवळ धावत्या ट्रकला भीषण आग
रत्नागिरी: बुधवारी रात्री जयगडमधील जांभारी फाटा येथे सैतवडे ते खंडाळा मार्गावर एका धावत्या आयशर ट्रकला अचानक आग लागली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती.
आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.