
थिबापॅलेस येथील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः वृद्ध महिला अंथरुणावरच बेशुद्ध पडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सुहासिनी जयवंत जाधव (वय ७०, रा. स्वराज्य थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुहासिनी या नेहमी प्रमाणे अंथरुणावर उठून बसल्या होत्या. त्यांना पेज पाजण्यासाठी नातेवाईक गेल्या असता त्या बेशुद्ध पडल्या. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.