गॅस गळतीने रिक्षा जळून खाक, रेडकू जखमी, टँकर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी :
गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी ते निवळी-बावनदी येथे चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसला सीएनजी गॅस भरलेल्या टँकरने समोरून जोरदार धडक दिली. धडकेमुळे प्रवाशांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये बसमधील ३० प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर टँकरमधील गॅस पसरल्यामुळे रस्त्याजवळच्या गोठ्याला आग लागली. सुदैवाने घरातील लोकांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, एक म्हैस जखमी झाली, तर घराजवळ असलेली रिक्षा जळून खाक झाली. सुरक्षिततेसाठी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती.
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी बावनदी येथे रविवारी सकाळी झालेल्या टँकर-मिनीबस मधील अपघात प्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा. राजेश महावीर यादव (ऱा चेंबुर, मुंबई) असे संशयिताचे नाव आह़े. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवला आह़े.
चिपळूण येथून शिक्षकांना घेवून येणाऱ्या मिनीबसला निवळी बावनदी येथे एलपीजी टँकरने जोरदार धडक दिल्याची घटना 8 जून रोजी सकाळी 8.25 वाजण्याच्या सुमारास घडली होत़ी. या अपघातात एकूण 31 जण जखमी झाले होत़े. तसेच लगतच्या घराला आग लागून घराचे, वाहनांचे तसेच गुरांचे होरपळूण नुकसान झाले होत़े. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालक राजेश यादव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281, 125(अ),(ब),324(4) व मोटार वाहन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
चिपळूण तालुक्यातील शिक्षक प्रशिक्षणासाठी मिनी बसने रविवारी (ता. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास रत्नागिरीकडे येण्यास निघाले होते. निवळी घाटात बावनदीपासून काही अंतरावर जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या जेटीवरून एलपीजी गॅस भरून मुंबईकडे चाललेल्या गॅस टँकरने (एनएलओ १ एन ४६२८) प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनी बसला (एमएच ०२ आरआर ९६०९) समोरून जोरदार धडक दिली. त्या मिनी बसमध्ये ३१ प्रवासी होते. अपघात एवढा भीषण होता की, बस २० फूट खोल दरीत उलटली. त्यामुळे बसमध्ये हाहाकार उडाला. सर्व जण जखमी आहेत. त्यात महिलांचा समावेश अधिक आहे.