पर्यावरण दिनानिमित्त पटवर्धन हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
रत्नागिरी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी प्रभाग क्रमांक 14 येथील पटवर्धन हायस्कूल येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण रक्षणार्थ मोलाची भूमिका बजावणार्या वृक्षांचे रोपण करून त्याचे संवर्धन व संगोपन ही काळाची गरज लक्षात घेऊन भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनानुसार ५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूलचे पदाधिकारी विनायक हातखंबकर, सतीश दळी तसेच भाजपा कार्यकर्ते श्री अमित विलणकर, माजी नगरसेविका सत्यवती बोरकर, माजी शहराध्यक्ष राजन फाळके, सचिन गांधी, मुकुंद विलणकर, विलास (अण्णा)विलणकर, सत्यवान शेठ बोरकर, भाई विलणकर , समीर वास्ता, आरबीआयचे अधिकारी श्री. कालेलकर, कमलाकर जोशी, मच्छिंद्र नागवेकर, उदय जी बसणकर, किशोर पावसकर, भालचंद्र विलणकर, अमेय घुडे, बबलू विलणकर, शहर सदस्या प्रतिभा नाखरेकर, मधुरा विलणकर, गणेश दादा विलणकर, अमित पावसकर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्हाळे मॅडम,ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक पाटील, कृ,चीं. आगाशे विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्राजक्ता कदम मॅडम, बालविभागाच्या शिक्षिका असावरी पावसकर, अपर्णा गोगटे, शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.