
दापोलीत तरुणाचा आकस्मिक मृत्यू
दापोली : उपजिल्हा रुग्णालयात कौतिक लक्ष्मण भिल्ल (वय ४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना उलट्या होऊन प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गणेश कॉलनी, वाकवली, दापोली येथे राहणारे आणि मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा, वाडा, रामपरा येथील रहिवासी असलेले कौतिक भिल्ल यांना शुक्रवारी (६ जून २०२५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उलट्या सुरू झाल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तात्काळ त्यांना दापोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कौतिक भिल्ल यांचा मृत्यू कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट (हृदय व श्वसनक्रिया थांबल्याने) आणि मायोकार्डियल इन्फ्रक्शनमुळे (हृदयविकाराचा झटका) झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.