
मंडणगडमध्ये गांजा सेवन करताना तरुणाला अटक
मंडणगड : तालुक्यातील पालघर येथे सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करताना एका तरुणाला मंडणगड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी, ५ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नदीकिनारी झाडाच्या आडोशाला करण्यात आली.
मंडणगड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रताप मावची यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बामणघर येथील रहिवासी रुपेश चंद्रकांत वलार (३४) हा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गांजाचे सेवन करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात ६ जून रोजी सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम ८(सी) आणि २७ नुसार रुपेश वलार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.