
मद्यपान करु नका सांगणाऱ्या पत्नीला पतीकडून कोयतीने दुखापत
रत्नागिरी ः तिवरेमेढे-साखरपा (ता. संगमेश्वर) येथे पतीने मद्याच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कोयती मारुन दुखापत केली. देवरुख पोलिस ठाण्यात पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश शांताराम नार्वेकर (वय २६) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) सायंकाळी सातच्या सुमारास तिवरेमेढे-साखरपा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी या घरात काम करत असताना पती जयेश हे नेहमी प्रमाणे मद्यपान करुन घरात आले. त्यावेळी पत्नीने त्यांना दारु पिवू नका असे समजावून सांगत असताना तू काही सांगू नकोस माझे मी बघतो असे पत्नीला बोलून शिवगाळ केली. जेवणाच्या खोलीतील जूना एक लोखंडी कोयता पत्नीच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी पत्नीने देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मद्यपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आङे.