
राजापूर नाटे येथील वृद्धचा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू
राजापूर : तालुक्यातील भंडारवाडी येथील रत्नाकर मनोहर करगुटकर (वय ५५) यांचा रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना दारूचे व्यसन होते आणि काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत असताना त्यांच्या डोक्याला मार लागला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे २०२५ रोजी रत्नाकर करगुटकर हे कातळवाडी, देवाचे गोठणे या ठिकाणी दारू पिऊन पडले असताना त्यांच्या डोक्याला मार लागला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील सुधीर शिरसाट यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच २ जून २०२५ रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. स्वराज, वैद्यकीय अधिकारी, सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.