
महिला बीच कबड्डी स्पर्धेसाठी समरीन बुरोंडकर कर्णधार
संगलट:
मंगिनापुडी बीच, आंध्र प्रदेश येथे जूनमध्ये ष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहेत. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा महिलांचा संघ सहभागी होणार आहे. स्पर्धेसाठी अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे, खेडची खेळाडू समरीन बुरोंडकर हिची संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाचे सराव शिबिर अलिबाग या ठिकाणी सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य संघाच्या कर्णधार पदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, मा.नामदार उदय सामंत साहेब उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबुशेठ तांबे, उपाध्यक्ष सतीश चिकणे, मंगेश मोरे, उमेश सकपाळ, संतोष दामूस्टे, सौ.नेत्रा राजशिर्के, जिल्हा सचिव नितीन बांद्रे, खजिनदार अभिजीत सप्रे, भाऊ पवार, पंचमंडळ प्रमुख सुधीर सावंत, सागर मोरे, सौ.संपदाताई गुजराती, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेशशेठ भोसले, उपाध्यक्ष श्री.भाई हंबीर, सुभाष आंबडे, सचिव रवींद्र बैकर, सहसचिव शरद भोसले, खजिनदार दाजी राजगुरू, एडवोकेट संदेश चिकणे, स्वप्निल सैतवडेकर दीपक यादव, दिलीप कारेकर, सुजित फागे, सौ.तेजा बैकर, महेश मर्चंडे, अनिकेत स्पोर्ट्स क्लब प्रशिक्षक, राष्ट्रीय प्रो कबड्डी पंच विलास बेंद्रे यांनी अभिनंदन केले. सर्व स्तरातून निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षा होत आहे.