सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस अडथळा ; तीन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी: शहरातील रस्त्यांची दुरवस्था असतानाही चर्मालय ते चंपक मैदाने येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या तीन वाहन चालाकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नबीरसुल लाळेमशाक गच्छीनमनी (वय २४) , मोहम्मद हनिफ रोशनअली मदार (वय ४८), व अमानुल्ला सत्तार काझी (वय ४७) अशी संशयित वाहन चालकांची नावे आहेत. या घटना रविवारी (ता. १) चार ते पावणेपाचच्या सुमारास चर्मालय ते चंपक मैदान येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित नबीरसुल गच्छीमनी यांनी चर्मालय ते चंपक मैदान रस्त्यावर टेम्पो (क्र. एमएच-०८ एपी ४३४६) ही रस्त्यात रहदारीस अडथळा होईल अशी पार्क केली तसेच संशयित मोहम्मद मदार यांनी टेम्पो (क्र. एमएच-०८ एपी ३३४६) तर अमानुल्ला काझी यांनी टेम्पो (क्र. एमएच-०८ डब्ल्यू ७५७५) सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस व वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क केले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार, सहायक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, पोलिस हवालदार अरुण चाळके यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.