गोळप येथे गावठी दारु बाळगणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे पडक्या घराच्या अंगणात गावठी हातभट्टीची 950 रुपयांची 9 लिटर दारु विक्रीसाठी बाळगणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 31 मे रोजी सायंकाळी 6.20 वा.सुमारास करण्यात आली.
योगेश चंद्रकांत पड्यार (40) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिला पोलिस शिपाई मिनल पवार हिने तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी संशयित हा आपल्या ताब्यात गावठी दारु विक्रीसाठी बाळगून असाताना ही कारवाई करण्यात आली.