
कोडओझरे येथील ९० टक्के भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः कोंडओझरे (ता. संगमेश्वर) येथील वृद्धाने आजाराला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शांताराम गंगाराम नाचरे (वय ७५, रा. कोंड-ओझरे, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शांताराम नाचरे यांना शुक्रवारी रात्री जोराचा खोकला लागला अचानक तब्बेत बिघडली. नातेवाईकांनी तातडीने रिक्षा सांगण्यासाठी गेले होते. त्याच कालावधीत त्यांनी घरातील रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतले त्यामध्ये ते ९० टक्के भाजले. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी शुक्रवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.