
लेलँड टेम्पो- दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
संगमेश्वर: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या सह्याद्री पॅलेस समोर अशोक लेलँड टेम्पो आणि दुचाकी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दिनेश गजानन पांचाळ (रा. कोळंबे, संगमेश्वर) यांना मार लागला असून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात असून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला आहे.
दीपक कृष्णा सुतार वय वर्ष 30 रा. कोल्हापूर हा तावडे ट्रान्सपोर्टच्या अशोक लेलँड टेम्पो(गाडी क्रमांक MH 9 EM/4478) घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय माहामार्गावरून संगमेश्वर ते शास्त्रीपुल असे जात असताना सहयाद्री पॅलेस समोर त्याच्या गाडी समोर संगमेश्वरच्या दिशेने येणारी दुचाकी जोरात येऊन धडकली.
दुचाकीस्वार दिनेश गजानन पांचाळ (रा. कोळंबे तालुका, संगमेश्वर) हे चिपळूण एसटी आगारात वाहक म्हणुन काम करतात, ते दुचाकी ( क्रमांक MH 08B/D 7960) घेऊन काही कामानिमित्त चिपळूण ते संगमेश्वर येत असताना त्यांना चक्कर आल्याने दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटूल्याने त्यांची दुचाकी थेट समोरून येणाऱ्या टेम्पो धडकली. एवढेच नाही तर दुचाकीचा काही भाग टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली आला होता. तर दुचाकीवरील सामान, व हेल्मेट रास्त्यावर पढले होते.