
झाडावरुन पडून तरुण जखमी
रत्नागिरी ः खोरनिनको (ता. लांजा) येथे झाडावरुन पडलेल्या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओमकार किशोर सावंत (वय ३२, रा. खोरनिनको, ता. लांजा, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळ साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओमकार सावंत हा सकाळी घराच्या परिसरातील वाढलेली झाडे तोडत असताना झाडावरुन खाली पडला. त्यामध्ये तो जखमी झाला. उपचारासाठी त्याला दुपारी सव्वातीन च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.