
साळवीस्टॉप येथे गरम पाणी पायावर पडून तरुण भाजला
रत्नागिरी ः जेवण करताना गरम पाणी पायावर पडून जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. कैसर मसुद अल्ली (वय ३०, रा. साळवीस्टॉप-झोपडपट्टी, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) रात्री साडेआठच्या सुमारास साळवी स्टॉप-झोपडपट्टी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कैसर बुधवारी घरी जेवण करत असताना त्याने पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. गरम पाण्याचा टोप खाली घेत असताना तो हातातून निसटला व पायावर पडला त्यामध्ये तो १० टक्के भाजला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.