स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरीच्या गुन्ह्यांमधील एका आरोपीला अटक
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
रत्नागिरी जिल्ह्यात चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.
बुधवार, दिनांक २८ मे २०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार खेड शहरातील नवानगर लवेल येथे गस्त घालत असताना, रत्नागिरी जिल्ह्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन रामसहजीवन चव्हाण (वय २१, रा. आजगणी नवानगर लवेल, ता. खेड जि. रत्नागिरी) हा संशयीत रित्या आढळला.
पोलिसांनी सचिन रामसहजीवन चव्हाण याची अधिक चौकशी केली असता, तो खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर १११/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५, ३ (५) आणि गुन्हा रजिस्टर नंबर ११८/२०२५ भा.न्या.सं.क ३३१ (४), ३०५, ३ (५) या दोन्ही गुन्ह्यांमध्ये हवा असल्याचे निष्पन्न झाले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी खेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्यांचा अधिक तपास खेड पोलीस ठाणे करत आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक श्री. वाघ, पो.हवा/३०१ श्री. बाळू पालकर, पो.हवा/३०६ श्री. गणेश सावंत, पो.हवा/१४१० श्री. सत्यजित दरेकर, पो.हवा/३३८ श्री. विक्रम पाटील, पो.हवा/४४४ श्री. रमिज शेख आणि चा.पो.शी- श्री. अनिकेत नलावडे यांनी पार पाडली.