मुंबई गोवा महामार्गावर बावनदी ते वांद्री चिखलाचे साम्राज्य, दुचाकी घासरून होताहेत अपघात
रत्नागिरी : गेले 5 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काँक्रीटीकरण चिखल साचल्याने यावरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. ठेकेदारांच्या नियोजनशून्य कारभाराचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गावर बाव नदी येथे दरडी कोसळून माती रस्त्यावर येऊन रस्ता चीखलमय झाला आहे. या मार्ग बावन दी पासून वांद्री पर्यंत चिखलमय झाला आहे. वांद्री येथेही अशीच स्थिती असून सोमेश्वर मंदिराजवळ वाहनांना मार्ग देण्यात आला आहे. मात्र येथे चिखल साचून रस्ता शोधावा लागत आहे. पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडून आंघोळ होत आहे.