रत्नागिरी परटवणे येथे गांजा सेवन करणाऱ्या तरुणाला अटक
रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास परटवणे येथे घडली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल अमित राघु पालये यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
या प्रकरणी रोहित राजेंद्र चव्हाण (वय ३५, मूळ रा. घर नं. १३९१, आंबेशेत, न्हावीवाडी, ता. जि. रत्नागिरी, सध्या रा. चव्हाण यांच्याकडे भाड्याने, कालिका नगर, मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. रोहित चव्हाण हा बेकायदेशीरपणे गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(अ) आणि कलम २७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.