महावितरण कंपनीचे ३४ लाखांचे नुकसान
जिल्ह्यातील तीन लाख ग्राहक बाधित
रत्नागिरी: गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावासाचा महावितरण कंपनीला मोठा फटका – बसला आहे. वादळीवारा व पावसामुळे १७ उपकेंद्रे बाधित झाली. ७२ उच्चदाब वाहिन्या, ६५ लघुदाब विद्युतखांब, ४२ उच्चदाब खांब, ४२५७ रोहित्रे, ९०८ गावे आणि ३ लाख ३१ हजार २७६ -वीजग्राहक बाधित झाले आहेत. सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर – सुरू आहे. यामध्ये महावितरणचे सुमारे — ३४ लाखांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी झालेल्या वादळीवारा व पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बाधित झाला. खांब पडणे, वीजयंत्रणेवर झाड पडणे आदी कारणांमुळे हा पुरवठा बाधित आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यात बाधित १७ उपकेंद्र दुरुस्त करण्यात आली असून, बाधित ७२ उच्चदाब वाहिन्यांपैकी ६६ वाहिन्यांची दुरुस्ती झाली आहे. ६५ पैकी ४९ विजेते खांब, बाधित ४२५७ रोहित्रापैकी ४१२६ रोहित्रे दुरुस्त झाली आहेत.