
खेडजवळ उभ्या लक्झरी बसला भरधाव लक्झरीची धडक
खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील एक्सल फाटा, लोटे (ता. खेड) येथे २२ मे रोजी रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास एका उभ्या असलेल्या बसला भरधाव लक्झरी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी राजेश गोपाळ आडकर (३६, रा., ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते आपली बस (क्र. एसएच १४ एल एक्स-७८५९) मालवण येथून बोरीवलीकडे घेऊन जात होते. एक्सल फाटा, लोटे येथे आल्यानंतर एका ट्रकला (क्र. के.ए-२२ डी ९७३२) यूटर्न घेताना पाहून त्यांनी आपली बस थांबवली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या मंगेश रामचंद्र चगडे (वय ३२, रा. गोरेगाव, गोरेगाव, मुंबई पूर्व) याने चालवलेली लक्झरी बस (क्र. एमएच ४६ बीएम-८२८३) अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. भरधाव वेगात असलेल्या या लक्झरी बसने उभ्या असलेल्या आडकर यांच्या बसला पाठीमागून उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
या अपघाताप्रकरणी खेड पोलिसांनी द२३ मे २०२५ रोजी सकाळी ०६.०३ वाजता गुन्हा दाखल केला आहे.